Share

पेगॅससप्रकरणी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा; राहुल गांधी यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. यामध्ये भारत सरकारचाही समावेश असून भारतातील 40 पत्रकारांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा संशय आहे.

पेगॅससच्या माध्यमातून गोपनीय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या मेसेजवरही नजर ठेवण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, आता काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चोकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पेगॅसिस हे शस्त्रासारखे असून दहशतवाद्यांविरोधात वापरण्यासाठी इस्त्रायलने ते तयार केले होते. या पेगॅसिस सॉफ्टवेअरचा पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकराने आपल्याच जनतेविरोधात वापर केला आहे. या सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!