🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात कोरोनाचा प्रसार गेल्या काही दिवसापासून चांगलाच वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फटका बॉलीवूडलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. गेल्या काही दिवसात बॉलीवूडमधील अनेक कलाकार व तंत्रज्ञ हे कोरोना संसर्गाने ग्रासले होते. यात अमिर खान, आर. माधवन, आलिया भट्ट यासारखे अनेक कलाकार आहे.
कोरोनाच्या या लाटेमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन आणि चित्रीकरण लांबणीवर पडले. आमिर खानचा बहुचर्चीत लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाचे प्रदर्शनही जवळपास वर्षभर कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडले आहे. या चित्रपटात आमिर खान सोबत अभिनेत्री करीना कपुर-खानची प्रमुख भुमिका आहे. करीना कपुर-खान ही या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गरोदर होती.
नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने या चित्रपटाशी निगडीत एक मजेशीर गोष्ट शेअर केली आहे. यावेळी तो म्हणाला की, एकिकडे संपुर्ण जग कोरोना संसर्गाशी लढत होते. मात्र आमचा लढा हा कोरोना आणि गरोदर असलेल्या करीना यांच्या सोबत सुरु होता. काही दिवसापुर्वीच करीना कपुर-खानने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड; ‘हे’ आहे कारण
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे

