टोकियो: गेल्या दीड वर्षापासून कोरोना या जगभर थैमान घातलेल्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम केला आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. यामध्ये जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जाणारी ऑलिम्पिक २०२० साली जपानची राजधानी टोकियो येथे पार पडणार होती. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऑलिम्पिक स्थगित केली गेली होती.
जगातील क्रीडारसिकांसाठी सर्वात मोठी पर्वणी मानल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान ही स्पर्धा होणार होती. त्यानंतर, २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचे नक्की केले गेले होते. त्यानंतर कोणत्याही परीस्थितीत स्पर्धा पार पडणार असल्याच आश्वासन जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिले होते.
त्यांनतर आता पुन्हा करोना साथीमुळे कशी परिस्थिती बिकट असताना काही विपरीत गोष्टी घडल्या तर त्याचा फटका देशवासीयांनाही बसणार आहे, त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकला पुन्हा एकदा विरोध वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या जपानमधील क्युडो न्यूजच्या सर्व्हेनुसार तेथील 72 टक्के जनतेचा टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला विरोध आहे.
टोकियो ऑलिम्पिकला आता 100 पेक्षा अधिक दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्व्हे करण्यात आला. यावेळी टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यात यावे असे 39.2 टक्के जनतेला वाटत आहे. तसेच 32.8 टक्के जनतेला वाटते आहे की, हे ऑलिम्पिक पुढे ढकलावे. 24.5 टक्के जनतेनेच टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना लसीकरणसाठी आजपासून नवे ६० केंद्र
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- आज रंगणार मुंबईविरुद्ध कोलकाता ; मुंबईसमोर मोठे आव्हान
- देवेंद्रजींबद्दल आता काय बोलणार…, मी पुन्हा येणार म्हणता-म्हणता ते आलेच नाहीत – बाळासाहेब थोरात
- दुसऱ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आनंदाची बातमी


