चेन्नई : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात चेन्नई येथे सामना रंगणार आहे. मात्र या सामन्याआधी सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाचा जरी पराभव झाला असला तरी आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाचे पारडे जड असणार आहे.
दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबाद सनरायझर्स संघाचा पराभव केला. मात्र दोन्ही संघातील आतापर्यंत झालेल्या २७ लढतीत मुंबईच्या संघाने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही संघात झालेल्या मागील १२ लढतीत कोलकात्याला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. यामुळे कोलकाता संघ मानसीक दबावाखाली खेळेल असा तर्क लावला जात आहे.
या सामन्यात मुंबई या सत्रातील आपला पहिला विजय साजरा करण्यासाठी उत्सुक असेल तर दुसरीकडे कोलकाता संघ दुसरा विजय मिळवून गुणतालीकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी आतुर असेल. युएईमध्ये झालेल्या गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. पहिल्या लढतीत पराभव झाल्याने मुंबई इंडियन्स विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल. तर हैदराबादवरील विजयाने कोलकाताचा आत्मविश्वास वाढला असेल.
महत्वाच्या बातम्या
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे
- ‘चंगु मंगु’ म्हणत उद्धव ठाकरेंवरिल टिकेनंतर नेटकऱ्यांनी कंगना झाली ट्रोल
- परभणी; ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे कोविड सेंटर मंजूर, खा.हेमंत पाटील यांनी दिली माहिती
- संजु जैसा कोई नही; या सत्रातील पहिल्या शतकासह अनोख्या विक्रमाला गवसणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

