🕒 1 min read
सांगली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात राजकीय उलथापालथ होईल असे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. यामुळे, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ सुरु असतानाच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
‘कुछ देर की खामोशी है, फारसे शेर आयेगा, तीन महिने की दुरी है, फिर हमारा दौर आयेगा’ अशी शायरी मुनगंटीवार यांनी केली होती. दरम्यान, गेल्या दीड वर्षात भाजप नेत्यांनी अनेकदा हे सरकार कोसळेल असं भाकीत वर्तवलं आहे. मात्र, अनेक अडचणी येऊनही हे सरकार अद्याप स्थिर आहे. सद्या, संजय राठोड, सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली आहे.
दरम्यान, अशातच रामदास आठवले यांनी हे ‘राज्यातील सरकार घालवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत,’ असं विधान केल्याने सर्वांच्याच भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. ‘ राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा फडणवीस, चंद्रकांतदादा आणि माझा प्रयत्न सुरू आहे’ अशी कबुलीच आज रामदास आठवले यांनी दिली आहे. सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना हे भाष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईशान किशनच्या ‘त्या’ वाक्यांनी मिळवून दिली थेट प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा
- मेहनत रंग लायी : अखेर आज भारतीय संघात ‘सूर्या’ तळपणार
- मेहनत रंग लायी : अखेर आज भारतीय संघात ‘सूर्या’ तळपणार
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
