Share

‘आमचे धनुभाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्त्व आहेत’, सुप्रिया सुळेंकडून शाबासकीची थाप

Published On: 

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली आहे.धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे २५ हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की,’खा.पवार साहेबांच्या प्रेरणेतून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम संबंध राज्यात राबविण्याचा मानस आहे. आयुष्यभर कसलाही आवाज कानी न पडलेल्या व्यक्तीला ऐकू येऊ लागले, यातील समाधान वेगळेच आहे! तसेच ट्विट मध्ये मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार देखील मानले आहे.

सुप्रिया सुळेंनी दिल्या शुभेच्छा
संपूर्ण कार्यक्रम सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून लाईव्ह पाहिला. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ‘आमचे धनु भाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहेत. त्या दिव्यांग व्यक्तीने ‘हो, भाऊ आवाज येतोय’ म्हणून जेव्हा उत्तर दिले, तेव्हा धनुभाऊंच्या चेहऱ्यावरील आनंद केवळ केलेल्या कामाचे समाधान नाही तर खूप काही सांगून गेला!’असे म्हणत त्यांनी मुंडेंनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!