मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अजूनही निर्णय झालेला नाही. यासंबंधी त्वरित निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शुक्रवारी दिला आहे.
यावरून आता महाविकास आघडीतील नेते राज्यपालांसह भाजपला लक्ष्य करत असून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना साद घातली आहे. ‘गृहमंत्री अमित शहांनी जसं 370 कलम हटवलं आणि खूप मोठा इतिहास केला, तसं महाराष्ट्रामध्ये देखील जे 12 आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती त्यांनी उठवावी,’ अशी मागणी करतानाच संजय राऊत यांनी भाजपला उपरोधिक टोला लगावला आहे.
तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. ‘राज्यपालांनी राजकारणातलं प्यादे बनू नये, राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील, तर देशाच्या अधिकारांवर संघराज्यवर हल्ला आहे. 12 आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
- माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं अभिवादन, म्हणाले…
- औरंगाबादेत शिवसेना, भाजप, काँग्रेस मनपा निवडणूकीच्या तयारीत व्यस्त; तर ‘राष्ट्रवादी’ अजूनही सुस्तच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

