Share

महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपला बहुजन विरोधी चेहरा उघड झालाय-पडळकर

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती होती. या दरम्यान जमा झालेल्या गर्दीवरुन चांगलीच टीका होतेय. यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनीही राज्य सरकारवर टीका केलीय. विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याची आठवणही पडळकर यांनी या निमित्त राज्य सरकारला करुन दिलीय.

या संदर्भात पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकरिता लोकहितासाठी आंदोलन केले तर माझ्यावर गुन्हे दाखल केले. तसेच वारकरी शिस्तीत आणि शांततेत शासनाला वारीची परवानगी मागतायेत तर त्यांना कोविडचे कारण दिले जातायेत.. आणि दुसरीकडे हजारो समर्थकांची गर्दी अजित पवार जमवतात मग त्यांच्यावर कुठलाही गुन्हा का दाखल होत नाही? मुळात जो गार्ड ॲाफ ॲानर फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात बंद केला तोच न स्वीकारण्याची नौटंकी कशाला? आपण शासनाचे कितीही कोटी खर्च करून आपली इमेजमेकींग करण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपला बहुजन विरोधी चेहरा उघड झालाय..’

कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसताना कोणत्याही राजकीय पक्षाने गर्दी जमवू नये असे अपेक्षीत आहे. मात्र, स्वत: उपमुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्याच कार्यक्रमात गर्दी जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होतेय. त्यात आता पंढरपूरच्या पायी वारीला परवानगी देण्यात यावी, ही मागणीही जोर धरत आहे. अशा पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गर्दी मात्र, वारंकऱ्यांना नियम लावले जात असल्याचा आरोप विरोधक करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!