मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी पहाटेपासून उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले की,’कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हें. रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे.’ तसेच पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असेही शिंदे म्हणाले.
विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने आवाहन करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2021
दरम्यान, गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत
- गडचिरोलीत पोलिसांची दमदार कामगिरी, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा!
- ‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; राऊतांचा रोखठोक सवाल
- सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू – प्रविण दरेकर


