🕒 1 min read
नाशिक : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
“राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. राज्य सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूनं विचार करून आणि नियम-अटींचे पालन करून सरकारने ही नावे पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा कालच अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- मनपाची धडाकेबाज कारवाई, १८ मोबाईल टॉवर सील
- मद्यपी तरुणाची डॉक्टरला मारहाण, वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी खुशखबर; रेल्वेने सुरू केल्या ‘या’ नवीन रेल्वेगाडया
- अतिक्रमणधारकांचा अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
