Share

मद्यपी तरुणाची डॉक्टरला मारहाण, वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : दात दुखत असल्याने रुग्णालयात आलेल्या तरुणाला मद्यपानामुळे उद्या उपचार करण्याचे सांगताच संतापलेल्या तरुणासह त्याच्या साथीदारांनी डॉक्टरला मारहाण केली. ही घटना 4 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास एमआयडीसी वाळुज भागात घडली.

डॉ. सय्यद तफजुल अली बासीत अली (वय ३३, रा. प्रियदर्शिनी कॉलनी, रावरसपुरा, पडेगाव) यांचे एमआयडीसी वाळुज भागात दंत रुग्णालय आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात मद्यपी तरुण कृष्णा गायकवाड गेला. त्यावेळी त्याने दात दुखत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यावर डॉक्टरांनी त्याला दातामध्ये चिकनचे हाड अडकले आहे. त्यामुळे भूल देऊनच ते काढावे लागणार असल्याचे डॉक्टर म्हणाले.

त्याचा राग आल्याने कृष्णा गायकवाड याने महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. तसेच रंजीत केरे व अन्य एका साथीदाराला सोबत आणत पुन्हा डॉ. अली यांच्या केबिनच्या दरवाजाला लाथ मारुन शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना डॉ. सय्यद काजीम अली वासीद अली हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण केली. तसेच डेंटल चेअर व मशीनची तोडफोड केली. त्यावरुन एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!