Share

मनपाची धडाकेबाज कारवाई, १८ मोबाईल टॉवर सील

Published On: 

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ताकर वसुली संदर्भात प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सक्त वसुलीचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने शहरातील ९ झोन मध्ये असणारे विविध मोबाईल कंपनीच्या टॉवर्सची थकबाकी बाबत सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी यांनी शहरातील ९ झोन मध्ये १८ मोबाईल टॉवर्स सील केले आहेत.

सील करण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्स मध्ये झोन १ मधील व्होडाफोन कंपनी चे १ टॉवर, व्हिआय नेटचे १ टॉवर, झोन क्रमांक २, ४, ६, ८ याठिकाणी इंडस कंपनीचे ६ मोबाईल टॉवर, झोन ३, ४, ६, ७  येथे रिलायन्स इन्फो चे ५ मोबाइल टॉवर्स, झोन ३ येथे एटीसी कंपनीचे १ टॉवर, झोन ८ मध्ये एअरटेल कंपनीचे १, व जीटीएल कंपनीचे १ मोबाईल टॉवर,  झोन ७ मध्ये एकेएमई यांचे १ टॉवर, आणि झोन ८ मध्ये व्हीजन इंडियाचे १ मोबाईल टॉवर यांचा समावेश आहे.

या सर्व सील केलेल्या मोबाईल टॉवर्स कंपनीकडे एकूण ३,२२,९३,२१२ रु थकीत होते. यापैकी रिलायन्स इन्फ्रा कंपनीने २२,०६,०५९  रक्कम जमा केली आहे. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स प्रमुख तथा कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे व मोबाईल टॉवर विशेष वसुली अधिकारी शिवाजी झनझन यांच्या नेतृत्वाखाली सर्व वॉर्ड अधिकारी, वसुली कर्मचारी यांनी ही कामगिरी पार पाडली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!