पैठण: पैठण तालुक्यातील अनुसूचित जातीजमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या निवासी अतिक्रमणधारकांची सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या सरकारी जागेवरील घरे, जागा मालकी हक्कामध्ये भाेगवट्या अन्वये नियमानुकूल नोंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष खडसन यांनी निवेदनाद्वारे केली हाेती.
या निवेदनांची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तात्काळ दखल घेतली आहे. पैठण तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या अतिक्रमण धारकांची तसेच सदसद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या लोकांची सरकारी जागेवरील घरे, याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शासन निर्णयानुसार अतिक्रमणधारक यांचे अतिक्रमणाबाबत विहीत प्रपत्र अ, ब ,क, ड, मधील माहिती तसेच १ ते ३० मुद्द्यावरील माहीती, संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद यांचे ठराव, ग्रामपंचायत ठराव, तसेच विहीत प्रपत्र अ, ब, क, ड, यावर गट विकास अधिकारी यांची प्रत स्वाक्षरीसहीत अहवाल, पंचनामा,टोच नकाशा,तसेच आवश्यक सर्व कागदपत्रांसह माहिती या कार्यालयास सादर करावी असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंडळ अधिकारी, तलाठी तसेच नगरपालिका प्रशासनाला दिले आहे केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- घाटीतील सफाई कामगारांना पदभरतीत सामावुन घ्या,आयटकची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- गटविकास अधिकारी राजगुरुना परत पाठवा; पंचायत समितीचा ठराव
- रेशीम शेतीमुळे वाढली आर्थिक उलाढाल, उमरावतीच्या शेतकऱ्यांची यशोगाथा
- …तर इंदापूरात डिपॉझिट जप्त झाले असते : अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
