🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७४ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या सर्व परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक निवेदन सादर करणे गरजेचे आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनावर फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देश सध्या दोन मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. एकीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कोअर कमांडर स्तरावरील अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
The Prime Minister ought to make a Statement in Parliament on the current position in Ladakh, post the Chinese illegal acquisition of Indian territory coming across the mutually agreed LAC. Farmers’ agitation should not take all our attention.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- अंदाज वर्तवण्याखेरीज फडणवीसांच्या हाती आता काहीही राहिलेले नाही; सुभाष देसाईंचा टोला
- ‘पिकेल ते विकेल’अंतर्गत आव्हाना येथे रयत बाजार
- 2009 च्या निवडणुकीत ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आजपर्यंत कळालेले नाही- धनंजय मुंडे
- अपात्र लाभार्थींना नोटीस; धनदांडगे शेतकरी ठरले अपात्र
- अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
