मुंबई : आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिस:या लाटेचा धोका टास्फ फोर्सने देखील वर्तविला आहे. त्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेचा बाब आहे. परंतु नागरीकांनी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा पुन्हा नाईलाजास्तव कडक र्निबध घालावे लागतील असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
टास्क फोर्सने देखील या विषयी सर्तकर्तेच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मागील १५ ऑगस्ट पासून ठाण्यासह इतर भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे, त्यादृष्टीने राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणो गरजेचे असल्याचे मतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. अन्यथा पुन्हा कडक र्निबध लावण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या आहेत.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले कि, ‘ऑक्सिजन प्लाँटचे हे आदर्श असे काम आपण करत आहे, त्याबद्दल प्रताप सरनाईक यांचं कौतुक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण हा दही हंडी, मात्र या सणावर निर्बंध लावले असतानाही काही लोक पालन करत नाहीत. काही राजकीय पक्ष हट्टाने दही हंडी रस्त्यावर साजरा करताना दिसत आहेत. ते स्वतःला कोरोनाच्या निमंत्रण देत आहेत, त्यांना या ऑक्सिजनची गरज आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरले – काकडे
- दरड कोसळली: औट्रम घाटात मदतकार्य सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

