मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर असताना त्यांच्या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांसोबत महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदानावर #एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.@BJP4Maharashtra @Sadabhau_khot @maheshklandge pic.twitter.com/m8mD6OYv3u
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 16, 2021
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मात्र कर्मचारी अडून बसले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठीच राज्य सरकारने एक समिती देखील नेमली आहे, मात्र या समितीवर एसटी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं सत्तेसाठी ‘हिंदुत्ववादी’ भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये- प्रविण दरेकर
- ‘आंदोलनाचा आज सातवा दिवस, या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार?’
- नोव्हेंबर महिन्यात पुढील सहा दिवस राहणार बँक बंद; जाणून घ्या
- ठाकरे सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय जारी; मानधनातही वाढ!
- पत्रलेखाने लग्नाच्या ओढणीवर राजकुमारसाठी लिहिला ‘हा’ खास संदेश


