Share

Mumbai| ‘मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है’, मुंबई पोलीस यांना तब्बल 26 मेसेज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यभरात एकीकडे मोठ्या जल्लोषाल दहीहंडी साजरी होत असतानाच रात्री पावणे अकराच्या दरम्यान मुंबई पोलीस यांच्या नियंत्रण कक्षात एका व्हाट्सअप वरून धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये मुंबईवर 26/11 सारखा अथवा त्यापेक्षा मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा नंबर पाकिस्तानी असल्याचा समोर आलं आहे. या नंबरवरून तब्बल 26 मेसेज आणि दोन स्क्रीन शॉट मुंबई पोलिसांना आले आहेत. अशातच हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी सशस्त्र सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीस यांना तब्बल 26 धमकीचे मेसेजः

शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागामध्ये ‘मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है’ अशा धमकीचे 26 मेसेज मुंबई पोलिसांना आले होते. ज्या नंबर वरून हा मेसेज आला आहे, तो नंबर पाकिस्तानी असल्यामुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. याप्रकरणी विरारच्या भाटपाडा मधून मोहम्मद या बावीस वर्षे तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.

संबंधित नंबर हा लाहोर येथीलः

संबंधित मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणा मार्फत चौकशी करण्यात आली आहे. मोबाईल नंबर हा पाकिस्तानच्या लाहोर येथील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचा समजलं आहे. मोहम्मद लाहोर येथील शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे कामाला आहे. त्याचा मोबाईल चोरीला गेला होता. मात्र, तो फोन अँड्रॉइड नसल्यामुळे त्या नंबर वरून व्हाट्सअप मेसेज आलाच कसा असं त्यांचं म्हणणं आहे.

भारतातलेच लोक आहेत सहभागीः

यादरम्यान, मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच 6 लोक मदत करणार असल्याचं देखील दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्या सहा जणांचे नंबर देखील सेंड करण्यात आले असून नंबर पाकिस्तानमधले असले तरी काम मात्र तिकडं चालणार असल्याचं मेसेजमध्ये म्हटलं आहे.

मुंबईकरांनी काळजी करु नयेः

आलेल्या दहशतवादी मेसेजची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून मुंबईकरांनी काळजी करू नये, तसेच निर्धास्त रहावे असं सांगण्यात आलं आहे. मुंबईच्या सागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मुंबईचे सागरी कवच अधिक सक्षम करण्यासाठी तटरक्षक दलाच्या समन्वयाने काम सुरू असल्याचं आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!