Share

पन्नास दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाकडे राजकारण्यांची पाठ

Published On: 

बीड : मागील पन्नास दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे राजकीय नेत्यांनी चक्क पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये लोक प्रतिनिधींविरोधात भावना व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणप्रश्नी गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन १ फेब्रुवारीपासून सुरु आहे. या आंदोलनाला सोमवारी पन्नास दिवस पूर्ण झाले. सोमवारपासून गुळज येथील नंदकिशोर चव्हाण व बाळासाहेब कर्डिले यांनी उपोषण सुरु केले आहे.

मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथेही १ फेब्रुवारीपासून आंदोलनास सुरुवात झाली. दरम्यान, मालेगावकरांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून परिसरातील गावांनीही बंद पाळून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

मालेगाव येथील आंदोलनास सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. कोविड प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने आंदोलक उपोषणाला बसत आहेत. ५० दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अद्याप एक दिवसाचाही खंड पडलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!