Share

आत्मदहनाची धमकी देणाऱ्या माजी सैनिकाला अटक

Published On: 

लातूर: मागील काही दिवसांपासून पानगाव ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची तक्रार केल्या नंतर सुद्धा कारवाई होत नसल्याने एक माजी सैनिकाने टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी देताच त्यांना अटक करण्यात आले. पानगांव ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

पानगावातील विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयाचा गैर व्यवहार झाल्याचा आरोप करीत माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने ती दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपिल केले. तरीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे चव्हाण यांनी मंगळवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

त्यामुळे मंगळवारी चव्हाण हे आत्मदहनाच्या तयारीने लातुरात दाखल होऊन एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी चर्चा करीत असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळूंके यांची भेट घालून दिली असता चव्हाण यांना ८ दिवसांच्या आत हवी ती माहिती देण्याच्या सूचनाही रेणापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!