Share

उस्मानाबाद; लिक्वीड ऑक्सीजन टँकची आज ट्रायल, १० टीएलचा टँक होणार कार्यान्वीत

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधात वाढ करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात लिक्वीड ऑक्सीजन टँकचे काम सुरू करण्यात आले असून सोमवारी त्याचा ट्रायल रन घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत हा १० टीएलचा टँक कार्यान्वीत होणार असून यामुळे ऑक्सीजनचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १५० होती. यात महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रविवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या २३५३ पर्यंत वाढली आहे. कोरोनाची रुग्णंसख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधेत वाढ करण्यात येत आहे. जिल्ह्यात डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पीटल १०, डेडीकेटेड कोव्हीड सेंटर १३ तर २९ कोव्हिड केअर सेंटर कार्यान्वीत आहेत.

गरजेनुसार आणखी सीसीसी सेंटरसाठी इमारती ताब्यात घेण्यात येणार आहेत. डीसीएचमध्ये ८७९ आयसोलेशन खाट, ऑक्सीजन सपोर्टेड ७३२ खाट, आयसीयू १८७ खाट तर १०४ व्हेंटीलेटर , डीसीएचसीमध्ये ४९२ आयसोलेशन खाट, २७४ ऑक्सीजन सपोर्टेड खाट, ९ आयसीयू बेड्स, ६ व्हेंटीलेटर तर सीसीसीमध्ये २९९७ आयसोलेश खाट, १०० ऑक्सीजन सपोर्टेड खाट उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!