कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून ठेवली असतांना उर्वरित सात टप्प्यातील प्रचार देखील जोरात सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी मंडळी प्रचाराला उतरली आहेत.
We are grateful to the Home Minister for conservatively claiming BJP's victory on only 26 seats out of 30 in the first phase of Bengal elections. My information is that it is winning all the 30 and a total of 300 seats out of 294.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) March 30, 2021
दरम्यान अलीकडेच भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. बंगाल निवडणुकीत भाजपला २०० जागा मिळतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, यशवंत सिन्हा भाजपला टोला लगावला आहे. ‘बंगाल निवडणुकीत भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.’ अशी उपरोधिक टीका करणारे एक ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीस उमेदवार मागे घेतील? ३ तारखेपर्यंत वाट बघा :जयंत पाटलांच मोठ वक्तव्य
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा’


