औरंंगाबाद : माझी बदनामी का करता म्हणत मावशीच्या नव-यावर लोखंडी कटरने प्राण घातक हल्ला करुन मावशीसह आजीला मारहाण केल्याप्रकरणी सय्यद वसीम सय्यद अजीज (वय २४, रा. इंदिरानगर, पंढरपुर) याने सादर केलेले अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी फेटाळला.
प्रकरणात जरीना फारुख खान (वय ३३, रा. सलामपुरे नगर, पंढरपुर) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी या पतीसह त्यांच्या इंदीरानगर येथील बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी बहिणीचा मुलगा सय्यद वसीमने याने माझी बदनामी का करता असे म्हणत फिर्यादी सोबत भांडण केले. तेंव्हा फिर्यादीने त्याला समजावून सांगितले, व ते आपल्या घरी परतले. रात्री पावणे नउ वाजेच्या सुमारास फिर्यादी या पती व आईसह घरी असतांना आरोपी तेथे आला.
त्याने माझी बदनामी का करतात म्हणत पुन्हा भांडण सुरु केले. त्याने फिर्यादीच्या पतीला मारहाण करुन लोखंडी कटरने त्यांच्या गळ्यावर वार करुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व त्यांची आई भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्या असता आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची देखील धमकी दिली. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

