बीड: एकीकडे कोरोना रुग्ण रेमडेसिविर मिळत नसल्याने त्रस्त आहेत तर अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे तर दुसरीकडे याचा गैरफायदा घेऊन रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणं सुरू आहे. २२ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा हा प्रकार शुक्रवारी रात्री बीडमध्ये समोर आल आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोविड रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी सध्या रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी धडपड करावी लागत आहे. अक्षरशः दिवसभर उन्हात थांबून रांगा लावून लोक रेमडेसिविरसाठी वाट पाहत आहेत. मात्र अशा हतबल रुग्णांच्या नातेवाईकांचा गैरफायदा घेत काही लोक काळाबाजार करताहेत. मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांना एका व्यक्तीने असा काळाबाजार होत असल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा लावून इंजेक्शन विक्री करताना संतोष नाईकवाडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीतून दत्ता निर्मळ आणि प्रकाश नागरगोजे यांनाही अटक केली गेली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या काळ्याबाजाराचा मास्टरमाइंड हा एका खासगी कोविड रुग्णालयाचा कंपाउंडर आहे. दत्ता निर्मळ हा एका खासगी कोविड रुग्णालयात कंपाउंडर आहे. प्रकाश नागरगोजेचे नातेवाईक त्या रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी भरती झाले होते. तेव्हा दोघांची ओळख झाली. यातून निर्मळने नागरगोजेच्या मदतीने ग्राहक सापडून रेमडेसिविर विक्री सुरू केली. तर, तिसरा आरोपी संतोष नाईकवाडे हा औषधनिर्माणशास्त्राचा विद्यार्थी असून तोही या दोघांचा मित्र आहे.
या आरोपींकडून जे इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले ते हिटेरो या कंपनीचे असून त्यांची मूळ किंमत ३ हजार ४०० आहे, मात्र हेच इंजेक्शन हे तिघे आरोपी तब्बल २२ हजार रुपयांना विकायचे. जप्त इंजेक्शनची बॅच कोणती, ते कुणाच्या नावे विक्री झाले होते, कोणत्या मेडिकलसाठी दिले गेले होते, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी औषधी विभागाला पत्र दिले जाईल. शिवाय, विक्री केलेले इंजेक्शन बनावट तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी त्याची रासायनिक तपासणीही होणार आहे, अशी महती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ऑपरेटिव्ह सोसायटी कडून पाच जणांनाची २३ लाखांची फसवणूक; भूम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!
- …पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारवर हल्लाबोल
- भारताच्या मदतीसाठी अमेरिकन प्रशासनावर दबाव
- पूर्ववैमनस्यातून मित्रानेच काढला मित्राचा काटा
- मोठी बातमी : PM CARES फंडातून मोदी सरकार उभारणार देशभरात ऑक्सिजन प्लांट


