Share

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन

Published On: 

मुंबई : ग्राहकांना हक्काची जाणीव व्हावी तसेच बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.  तसेच या दिवसाचे एक वेगळे महत्त्व आहे. या दिवशी  १९६२ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे करण्यात आलेल्या भाषणात  ग्राहकांना चार हक्क प्रधान करण्यात आले ते म्हणजे सुरक्षिततेचा हक्क, निवडीचा, प्रतिनिधित्व आणि माहितीचा हक्क.

त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मूलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली  आहे. भारत सरकारने ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी २६ डिसेंबर १९८६ ह्या दिवसापासून ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात आणला . परंतु हा  कायदा आमलात आणून २५ वर्ष उलटली तरी आजही ग्राहकांचे होणारी फसवणूक थांबली नाही.

ग्राहक हक्क दिनाचे विशेष महत्त्व असणाऱ्या दिवशी  ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून, विशेष म्हणजे या चर्चासत्रामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सहभागी होणार आहेत. ग्राहक हक्क दिनानिमित्त होणाऱ्या चर्चासत्रामध्ये खासदार शरद पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे. तसेच राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. आर सी चव्हाण, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, सदस्य डॉ. संतोष काकडे, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या माजी सदस्य राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. ए पी भंगाळे, उदय वारुंजीकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!