Share

खासदार इम्तियाज यांच्या याचिकेवर पदस्थापनेबाबत कालबध्द कार्यक्रम सादर करण्याचे आदेश

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. राज्य शासनाच्यावतीने आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी रिक्त पदे संदर्भात अतिरिक्त शपथपत्र दाखल केले. त्यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयासमोर राज्य शासनाची बाजु मांडली.
राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील हे व्यक्तिश: न्यायालयात त्यांची बाजु मांडून युक्तिवाद करत आहे. जनहित याचिकेच्या या आठवड्यात आज सलग तिसऱ्यांदा सुनावणी झाली.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयास पुढील सुनावणीच्या वेळी औरंगाबाद आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि त्यासंदर्भातील भरती प्रक्रियाबाबत तपशिलावर माहितीसह प्रतिज्ञा पत्रामध्ये सादर करण्याचे नमुद केले. न्यायालयाने महाधिवक्ता यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असतांना सुध्दा आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी एवढा विलंब का होत आहे ? अशी विचारणा केली असता त्यावर महाधिवक्ता यांना भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर कालबध्द कार्यक्रम सुधारित प्रतिज्ञापत्राव्दारे पुढील सुनावणी दिनांक २९ जुन २०२१ च्या अगोदर सादर करण्याचे आदेशित केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी आपली बाजु मांडत असतांना शासनाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणुन दिले की, राज्यामध्ये सिव्हिल सर्जन संवर्गातील एकुण ६८३ पदे असुन त्यापैकी २९६ पदे हि रिक्त आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील २८७ पदापैकी २०५ पदे, स्पेशॅलिटी संवर्गातील ५६५ पदा पैकी ४०० पदे, जिआरडी संवर्गातील १०३२३ पदा पैकी ३७६७ पदे रिक्त आहेत. तसेच कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शासनाने सदरील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारे विलंब न करता त्वरीत भरती प्रक्रिया राबवावी असा युक्तिवाद केला. मा.उच्च न्यायालयाने महाधिवक्ता यांना पुढील सुनावणीच्या वेळी सविस्तर सर्व मुद्दयांवर स्पष्टीकरण देणारे कालबध्द कार्यक्रमासहित सुधारित प्रतिज्ञा पत्र दाखल करण्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!