लातूर : ज्यांनी लहानाचे मोठे केले, अशा आईवडिलांचाच त्यांच्या वृद्धापकाळात तिटकारा केला जात असल्याची अनेक उदाहरणे समाजात आहेत. उतारवयात अनेक ज्येष्ठांना दीनवाणे जीवन जगावे लागते. असाच प्रकार लातूर जिल्ह्यात समोर आला. सीनियर सिटीझन कायद्यानुसार सांभाळ न करणाऱ्या मुलांकडून पोटगी मागण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसून येते. ज्येष्ठांकडून मुलांसोबतच सुनांकडूनही पोटगी मागण्यात येत आहे. अशाच एका प्रकरणात तीन विधवा सुनांनी वयोवृद्ध सासूला दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी द्यावी, तर अन्य दोन प्रकरणांत मुलांसोबत सुनांनीही सासूला पोटगी द्यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी दिले आहेत.
लातूरच्या बोरीमधील एका प्रकरणात सासू मन्याबाई भालके यांनी पती व तीन मुलांच्या निधनानंतर त्यांच्या स्नुषा लक्ष्मीबाई भालके, अरुणा भालके व सुनीता भालके या सांभाळत नसल्याची तक्रार करून तिघींकडून पोटगी मिळण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी सुनावणीनंतर तिन्ही सुनांनी सासूचा सांभाळ करण्याची तयारी दाखवली. सुनावणीअंती उपविभागीय अधिकारी यादव यांनी सासू मन्याबाई भालके यांना उदरनिर्वाह तसेच औषधांसाठी तिन्ही सुनांनी दरमहा प्रत्येकी हजार रुपये पोटगी देण्याचे आदेशित केले.
अशाच एका दुसऱ्या प्रकरणात शिवाजीनगरमधील फुलाबाई तानाजी माने यांनी मुलगा शाहूराज माने, सुना राधा माने व सिंधुबाई माने यांच्याकडून पोटगी मिळण्याची मागणी केली होती. फुलाबाईंनी तिघेही घरातून बेदखल करून त्रास देत असल्याची तक्रार केली होती. पोलिसांतही अशीच तक्रार नोंदवलेली होती. याप्रकरणात मुलाने व सुनांनी फुलाबाईंचा सांभाळ करण्याचे बंधपत्र दाखल केले आहे. उपविभागीय अधिकारी यादव यांनी फुलाबाईंना मुलाने व सुनेने दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी देण्याचे आदेशित केले.
महत्वाच्या बातम्या
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- “शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”
- ‘हिंदू धर्मियांचा अपमान करणाऱ्या एल्गार परिषदेतील नेत्यांवर अजूनही कारवाई का झाली नाही ?’
- परभणी शहरात क्षुल्लक कारणातून खून, काही तासांतच आरोपी गजाआड
- सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

