Share

“शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्यातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या उत्कृष्ट अशा फलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या युवा खेळाडू शुबमन गिल याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे.

त्यावरच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी गिलचे कौतुक करत म्हटले की, “त्याच्यामध्ये क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळण्याची क्षमता आहे. मी त्याच्या खेळावर सर्वात जास्त तेव्हा प्रभावित झालो जेव्हा मी त्याला पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड यांच्या शॉर्ट पीच गोलंदाजीवर खेळताना पाहिले. तो प्रत्येकवेळी तयार होता. तसेच त्यांच्या गोलंदाजीवर त्याने हूक शॉटदेखील खेळले. तो खूप वेगाने प्रगती करत आहे. मला वाटते की, येणाऱ्या पुढील १० वर्षात त्याचे नाव जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!