परभणी : जायकवाडी वसाहतीमध्ये रविवारी रात्री झालेल्या खूनप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सोमवारी आरोपीला ताब्यात घेतले. क्षुल्लक कारणातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जायकवाडी परिसरात रविवारी रात्री जयवंत पवार यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहायक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, फौजदार रमेश गायकवाड, फौजदार शैलेश जाधव, फौजदार अजय पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल धाव घेऊन तपास सुरू केला.
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पंचनाम्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. यादरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत साईबाबा नगरातील रवींद्र उडानशिव यास अवघ्या काही तासांत जेरबंद केले. शिव्या दिल्याचा राग मनात धरून रवी उडानशिव याने जयवंत पवार यांचा खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- उपराष्ट्रपतींकडूनही रहाणेवर कौतुकाची थाप
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

