औरंगाबाद : सर्व क्षेत्रांना उभारी देणारा आणि सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी केंद्रिय अर्थसंकल्पाबाबत भावना व्यक्त केल्यात.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘कोरोनानंतर आलेले संकट लक्षात घेऊन आरोग्य, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा यासह सर्व क्षेत्रांना उभारी देणारा आणि सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आहे. कोरोनाच्या महा भयानक संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे, कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद यात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबरोबरच शेती व उद्योग क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यावर यात भर देण्यात आला आहे.
शेती मालाला दीडपट भाव, हमी भावाने खरेदी, मजूरांसाठी अन्न सुरक्षा योजना, रस्ते, लहान सिंचन प्रकल्प, लघुउद्योग, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण पायाभूत योजना आदी विविध क्षेत्रांसाठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, एकूणच या अर्थसंकल्पाने शेती, उद्योगांसह सर्व सामान्यांच्या हिताचा विचार केला आहे, असे पंकजा यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- उपराष्ट्रपतींकडूनही रहाणेवर कौतुकाची थाप
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

