मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी याने भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे.
3 दिवस लोटले मात्र अजूनही #हिन्दूधर्म , हिन्दू समाज यांचा अपमान करणार्या #यलगारपरिषदेच्या नेत्यावर कारवाई का नाही? येणार्या 48 तासात कारवाई नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल @OfficeofUT@AnilDeshmukhNCP
— Ram Kadam (@ramkadam) February 2, 2021
दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार राम कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.तीन दिवस उलटून गेल्यावर देखील हिंदूंचा अपमान करणाऱ्या एल्गार परिषदेतील नेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.महाराष्ट्र सरकार नेमका कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.यापुढे हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. येत्या ४८ तासात जर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशारा आमदार कदम यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- उपराष्ट्रपतींकडूनही रहाणेवर कौतुकाची थाप
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !


