अहमदनगर : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लग्न समारंभ, मेळावे घेण्यास बंदी घातली आहे. मात्र, भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीरामपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन गर्दी जमविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर पोलिसांना दिला आहे.
श्रीरामपूर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील हे आले असता, पत्रकारांनी ही घटना त्यांना निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे शुक्रवारी १२ मार्च रोजी श्रीरामपूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीनंतर श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील ‘अनमोल रसवंती’च्या सभागृहात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित झाले होते. मेळाव्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले
आमदार विखे-पाटील, माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, प्रकाश चित्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, केतन खोरे, बबन मुठे, गिरिधर आसणे, भाऊसाहेब बांद्रे यांच्यासह मोठा कार्यकर्त्यांचा समुदाय यावेळी उपस्थित होता. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन गर्दी जमविली, या मेळाव्याला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, पाटील यांनी तत्काळ श्रीरामपूर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा; होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी’
- जॅकलिनचा बोल्ड फोटोशूट चाहते म्हणाले…
- व्यावसायिकांनी लॉकडाऊन काळामध्ये प्रशासनाला सहकार्य करावे – नितीन राऊत
- मराठी बिग बॉस मधील सर्वात रोमँटिक जोडीचा ब्रेकअप?
- गौतमीचं एक स्मितहास्य आणि चाहते घायाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

