पुणे : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज भाजपचे आज राज्यभर ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे.
या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचत विरोधकांना देखील झापलं आहे.
‘मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’ अशी टीका त्यांनी केली आहे.
‘मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत’ असा घणाघात देखील फडणवीसांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या महाविकासआघाडीची पार्टी जोरात चालू आहे’
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकहेड
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी


