Share

“सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. विधिमंडळात विरोधी पक्ष बाकावर बसलेल्या भाजपा नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन विधिमंडळात गदारोळ घातला. आजच्या तीसऱ्या दिवशीही विरोध विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झाले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले प्रतिक्रिया देताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षपद मजबूत आणि अनुभवी माणसाला मिळालं पाहिजे, असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. हायकमांड काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. भाजपनं त्यांच्या काळात राज्यात अधिवेशन कसं चालवलंय हे जनतेनं पाहिलं आहे. नरेंद्र मोदी संसद कशी चालवतात हे देशानं पाहिलं आहे. विरोधकांनी काल आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

सत्ता गेल्यानं आलेला हताशपाणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नोकरभरती घोटाळ्यामध्ये पटवारी, कृषी सहाय्यक भरती घोटाळा सुरु झाला होता. सुखदेव डेरेला क्लिन चिट देण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस क्लीन चीट द्यायचे, ते न्यायधीश असल्यासारखं वागायचे, असेही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!