🕒 1 min read
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत DMKने दमदार विजय मिळवला आहे. DMKचा संपूर्ण कार्यभार सध्या करुणानिधी यांचा मुलगा MK स्टॅलीन सांभाळत आहेत. शुक्रवारी स्टॅलीन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची कमान आपल्या हाती घेतली. तसेच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात ३४ मंत्र्यांनी निवड केली आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत.
आज DMK अध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलीन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला DMK नेत्यांसह स्टालिन यांच्या पत्नी दुर्गा स्टालिनही उपस्थित होत्या. एम. के. स्टॅलीन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच दुर्गा स्टालिन यांना अश्रू अनावर झाले.
राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टॅलीन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी समारोहासोबतच त्यांनी स्टॅलीन यांच्या मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब केलं. MK स्टॅलीन यांची पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. स्टॅलीन यांनी के. एन. नेहरु यांना नगरपालिका परिषद प्रशासन विभागाचा कारभार दिला आहे. तर गांधी यांच्याकडे हथकरधा, खादी ग्रामोद्योग मंत्री बनवण्यात आलं आहे.
Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu.
He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit pic.twitter.com/e8IZT1aNFz
— ANI (@ANI) May 7, 2021
महत्वाचं म्हणजे स्वत: स्टॅलीन यांचे नाव हे रशियन क्रांतिकारक आणि समाजवादी नेते स्टॅलीन यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात आता स्टॅलीन यांना गांधी आणि नेहरु रिपोर्ट करतील असं चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजितदादा धडाडीचे नेते पण उपमुख्यमंत्री झाल्यावर ते का बदलले हे मला समजत नाही’
- मृतदेहाची अदला-बदली होतेय, तरी गांभीर्य नाही, अतुल सावे यांची राज्य सरकारवर टीका
- ‘यामुळेच’ होतेय लसीकरण केंद्रावर गर्दी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होऊ शकतो कोरोनाचा वेगाने प्रसार!
- केंद्रीय मंत्री बंगालमध्ये येऊन दंगली भडकवत आहेत; ममतादीदींचा गंभीर आरोप
- सोलापूर : रमजान ईदनिमित्त नियोजित कडक संचारबंदी शिथिल करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
