Share

‘यामुळेच’ होतेय लसीकरण केंद्रावर गर्दी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होऊ शकतो कोरोनाचा वेगाने प्रसार!

Published On: 

औरंगाबाद : एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच दुसरीकडे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता देखील आता वर्तविली जात आहे. एकतर लसीकरण केंद्र कमी त्यात एकदा नाव रजिस्टर करायला रांग, एकदा लस घेण्यासाठी अशा दोन वेळा रांगा लावण्याची वेळ येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे महापालिकेने ४५ च्या पुढील, तसेच १८ प्लस नागरिकांची लसीकरण मोहिम सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी मोफत लस पुरविण्यात येत असली तरी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वारंवार लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने दर आठवडयाला एक लाख लसींची मागणी केलेली आहे. मात्र सरकारकडून केवळ २५ ते ३० हजार लस पुरवली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच दुसरीकडे लग्न समारंभ देखील कमी लोकांमध्ये केले जात आहेत. गर्दी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांना कसरत करण्याची वेळ आली आहे. एका केंद्रावर शंभर लोकांना लस दिली जात आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोक केंद्रावर येऊन गर्दी करत आहेत. त्यातच दोनदा रांगा लावण्याची वेळ आली आआहे तरी देखील नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. याशिवाय पहिली लस घेणारे ऑनलाईन नाव नोंदवीत आहेत परंतु तरीही थेट लसीकरण केंद्रावर लस मिळते की नाही यासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे देखील गर्दी वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!