सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन महाविकास आघाडीमधील मंत्री करत आहेत. मात्र दुसरीकडे मराठा नेत्यांकडून सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. अजितदादा धडाडीचे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी आदर असून ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले हे मला समजत नाही. विरोधात होते त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर ते प्रत्येकवेळी माझ्याशी बोलायचे. आता ते काही बोलत नाहीत. त्यांनी सारथी संस्था बंद पाडली, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळास दोन वर्षात एक रुपयाही दिला नसल्याचा आरोप करत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी अजित पवारांवर टिका करत महाविकास आघाडी सरकार स्वत:च्या कर्माने पडेल, असे वक्तव्य केले.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या युवकांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकावले आहे. यामुळे त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. पोलिसांनी संरक्षण देतानाच त्या युवकांच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यावी, त्यांनी तक्रार न दिल्यास पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: आमदार शिंदे यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली.