Share

मृतदेहाची अदला-बदली होतेय, तरी गांभीर्य नाही, अतुल सावे यांची राज्य सरकारवर टीका

Published On: 

औरंगाबाद : लातूरमध्ये मृतदेहांची अदला-बदली झाली होती. अक्षरशः दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला होता. अशी गंभीर घटना होऊनसुद्धा सरकारने अजून कारवाई केली नाही. तसेच आरोग्य सेवेसाठी सरकार गंभीर नसून उपाय योजना प्रभावी पणे दिसून येत नसल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची अदला-बदली लातूर जिल्ह्यामध्ये झाली होती. यामध्ये दफन झालेला मृतदेह जमिनीतून उकरुन काढण्यात आला होता. तो मृतदेह पुन्हा खऱ्या नातेवाईकांना देण्यात आला होता. त्यामुळे राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यसरकार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी अशा आरोग्य सेवेवर गांभीर्याने बघत नसून सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. मृतदेह बदल होणे हि रूग्णालयाची चूक आहे. त्याचे गांभीर्य सरकारला नाही. आरोग्य सेवेची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.

 महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!