नांदेड : येथील नगरपालिका क्षेत्रातील नागरी दवाखान्याची मुख्य इमारात ही पुर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे बाह्यरुग्ण तपासणी ही चक्क उघड्यावर लिंबाच्या झाडाखाली करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा नगरपालिका क्षेत्रात असलेल्या नागरी दवाखान्याची मुख्य इमारत जीर्ण झाल्यमुळे कधिही कोसळण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचा नागरी दवाखाना हा शहराच्या मध्यवर्ती भागात सुरु आहे. नेहमी १०० के १५० रुग्णांची रेलचेल असलेल्या या दवाखान्यात कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या ५० वर आली आहे. दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करतात व त्यांच्यावर प्रथमोपचार करतात. मात्र दवाखान्याची मुख्य इमारत जिर्ण झाली असुन मोडकळीस आली आहे. जिल्हा परिषद हा दवाखाना स्थलांतरीत करण्याच्या तयारीत होते. मात्र नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला.
सद्यस्थितीत येथे नागरी दवाखान्याच्या दोन लहान इमारती आहेत. मात्र तेथे रुग्णांची तपासणी शक्य नसल्याने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांना दवाखान्याच्या प्रांगणात झाडाखाली रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. नविन इमारतीसाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर लोकप्रतिनीधी यांना मागणी केली आहे. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.
महत्वाच्या बातम्या
- प. बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी मंत्र्याने केला भाजपात प्रवेश, 76 नेते ममतांची साथ सोडण्याच्या तयारीत
- विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- ‘कायदा सर्वोच्च, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे’ तापसीच्या प्रियकराला केंद्रीय क्रीडा मंत्र्याचं प्रतिउत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
