बर्लिन – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडला. यामध्ये सामान्य नागरिकांपासून कलाकार, राजकारण, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर इतर देशातील भवितव्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे कधीकाळी अफगाणिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेले सय्यद अहमद शाह सादत यांनी देखील देश सोडला होता. त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला असून Leipzig शहरात पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत
सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा फोटो अफगाणिस्तानचे माजी मंत्री सैयत अहमद शाह सादर यांचा आहे. अफगाणिस्तानचे माजी दूरसंचार मंत्री सैयद अहमद शाह सादत एकेकाळी सूट-बूट घालून, गळ्यात टाय बांधून आणि सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यामध्ये राहत होते. मात्र तालिबानची सत्ता आल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यांनीही देश सोडला. सध्या ते जर्मनीच्या रस्त्यावर पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करताना दिसत आहेत.
सादत आता जर्मनीच्या ”लीफरांदो नेटवर्क’ साठी काम करत आहे आणि ते जर्मनच्या लिपझिंग शहरात सायकलद्वारे लोकांना पिझ्झा डिलिव्हर करत आहे. मात्र, सादत यांनी गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.ते 2018 पासून कॅबिनेट मंत्री होते परंतु अफगाणिस्तानच्या गनी सरकारशी मतभेद झाल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.राजीनामा दिल्यानंतर ते जर्मनीला गेले आणि तिथेच राहू लागले.
याआधी ते 2005 ते 2013 पर्यंत अफगाणिस्तानमधील संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्याचे मुख्य तांत्रिक सल्लागार यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.सादत यांनी 2016 ते 2017 या कालावधीत लंडनमध्ये एरियाना टेलिकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी थांबणार नाही…’; उर्वरीत जन आशीर्वाद यात्रेबाबत नारायण राणेंची घोषणा
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- राणे प्रकरणातही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; ‘विरोधात’ही दानवे-खैरे यांची तोंडे ‘विरुद्ध’ दिशेला!
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


