मुंबुई : बॉलिवूडचा ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला. या चित्रपटाचे खूप चर्च झाली होती. तसेच या चित्रपटातील कलाकरांचे देखील कौतुक करण्यात आले होते. याचित्रपटातील अभिनेत्री फ्रीडा पिंटोने तिच्या अभिनयाने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. मात्र आता ती एका गोष्टीमुळे चर्चेत आहे.
फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे ती आई होणार असल्याचे सांगितले आहे. फ्रीडाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणारा पती कॉरी ट्रॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फ्रीडा प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लवकरच तिच्या बाळाचा जन्म होणार आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CQqwSe_MiWk/?utm_source=ig_web_copy_link
फ्रीडाने फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत २०१९मध्ये साखरपुडा केला आहे. कॅरीच्या वाढदिवशी फ्रीडाने फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. त्या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. त्यामुळे लग्नाआधी फ्रीडा प्रेग्नंट असल्याने यावर अधिक चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- ‘तिच्यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर बनलंय’ ; अर्जुनने मलायकासाठी लिहिली भावूक पोस्ट
- १ जुलैपासून ‘या’ बँकेतील ग्राहकांना जाणून घ्यावा लागेल नवीन IFSC Code
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- ‘गर्व आहे मला भक्त असल्याचा’ अमृता फडणवीस याचं ट्विट


