Share

मनपा निवडणूकीत ‘शिवसेना’ सत्ता काबीज करणारच : आ.दानवे

Published On: 

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मनपात सत्ता काबीज करण्यासाठी जोरबैठकास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत आपला जलवा दाखवत उतरलेली शिवसेना आता मनपा निवडणूकीसाठी देखील सज्ज होऊन मैदानात उतरली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे आणि यापुढेही मिळेल त्यामुळे शहराच्या विकासासाठी शिवसेना सत्ता काबीज करणारच, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी केला.
पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी वॉर्डावॉर्डांत बैठकांचा धडाका दोन दिवसांपासून सुरू केला आहे. सोमवारी (दि.१८ )पश्चिम विधानसभा मतदारसंघात विविध वॉर्डांत या बैठका घेण्यात आल्या. दरम्यान, झांबड इस्टेट येथील मीनाताई ठाकरे हॉलमधील बैठकीत वेदांतनगर, बन्सीलालनगर, पदमपुरा, कोकणवाडी, क्रांतीनगर, क्रांतीचौक, एकनाथनगर, पीरबाजार, उस्मानपुरा, ज्योतीनगर या वॉर्डांतील पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

जनतेसमोर शिवसैनिकांची विकासकामे आहेत : आ.दानवे
आजपर्यंत सर्वांत मोठी भूमिगत गटार योजना झाली. रस्त्यांची कामेही बरीच मार्गी लागली आहेत. पडेगाव व चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने कचर्‍याचा प्रश्‍नही आता सुटतो आहे. स्मार्ट सिटीबस, एलईडी दिवे, मास्टर इंटिग्रेटेड सिस्टीम, सीसीटीव्हीची यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. ही सर्व कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे आता शिवसैनिकांनी पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे. या उद्देशाने जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, मतदान नोंदणी करून घेण्याचे आवाहन आ. दानवे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!