औरंगाबाद : औरंगाबाद शहरात काम आटोपून रात्री २ वाजेच्या सुमारास घरी निघालेल्या एका दैनिकाच्या संपादकाला मारहाण करून लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या प्रकरणी चोरट्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. ही घटना महावीर चौक परिसरातील हॉटेल रविराजसमोर घडली.
शेख चांद पाशा नईम शेख असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कृष्णकांत भगवंत प्रसाद तिवारी हे एका दैनिकात काम करतात. १८ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास ते काम आटोपल्यानंतर म्हाडा कॉलनी येथील घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. हॉटेल रविराजसमोर दोन अनोळखी तरुणांनी त्यांना क्रांती चौक पोलीस ठाण्याकडे हाच रस्ता जातो का, असे विचारणा केली आणि रोखले. त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली.
तिवारी यांनी पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या बोटातील १५ हजारांची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेऊन ते पसार झाले. याविषयी त्यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी तपास करत चोरट्याला अटक केली.
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

