🕒 1 min read
मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. ३२ वर्षांत गॅबावर ऑस्ट्रेलियाला एकही पराभव पत्कररावा लागला नव्हता मात्र आज टीम इंडियानं त्यांची ही मालिका खंडीत केली.
आता ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्याची चाहूल क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. ५ फेब्रुवारीपासून या दौऱ्यातील सामन्यांची सुरवात होणार आहे. तर, पहिल्या दोन कसोटींसाठी संघ देखील घोषित करण्यात आहे. या संघात देखील युवा खेळाडूंना स्थान देण्यात आला असून विराट कोहली, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा देखील पुनरागमन करणार आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल
India have announced the squad for the first two Tests against England
Captain Virat Kohli, Ishant Sharma, and Hardik Pandya are back in the side https://t.co/vUCGQkIK2e #INDvENG pic.twitter.com/rj0OnRJACF
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांविरोधात खुद्द शरद पवार उतरणार मैदानात !
- मोठी बातमी : कोरोना लसीबाबत सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली महत्वाची मागणी
- ‘स्वतःला जाणते नेते समजणारे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत’
- पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदी कोण? काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, वरपुडकरांचेही नाव चर्चेत
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
