औरंगाबाद : पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. मात्र, एवढी महागाई होऊनही कोणतीच संघटना, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी गाडी ढकलो आंदोलन केले होते. मात्र त्यात गंभीरतापेक्षा ‘चमकोगिरी’च जास्त दिसून आली.
पूर्वी पेट्रोल-डिझेल असो वा गॅस किंवा जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, लोक आंदोलन करत. रस्ता जाम करून टाकत. या आंदोलनाचा आवाज मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत जात असे. कांद्यातील भाववाढीने तर, भाजपचेच केंद्रातील सरकार पडले होते. मात्र, आता महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल ९३ रुपये तर डिझेल ८३ रुपये लिटरपर्यंत जाऊन भिडले आहे. मागील चार वर्षांत लिटरमागे पेट्रोल १९ रुपयांनी तर डिझेल १७ रुपयांनी महागले आहे. पण विरोधी पक्ष असो की अन्य संघटना असो, एवढेच काय मध्यमवर्गीयही मूग गिळून बसले आहेत. कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार नाही.
लोकांना आता महागाईची सवय लागली की उत्पन्न वाढले, किंवा कितीही आंदोलने केली तरी सरकारवर काहीच परिणाम होत नाही म्हणून विरोधी पक्ष, संघटना यांच्यात नैराश्य आले आहे, असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत. आंदोलनाला जनतेची साथ आता मिळत नाही, आंदोलन केले तरीही दखल सरकार घेत नाही, आंदोलन करणाऱ्यांना सरकार विविध गुन्ह्यात अडकविते, अशा भीतीत संघटना अडकल्याचे पदाधिकारी खासगीत सांगतात.
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

