औरंगाबाद : एमआयएमसोबत भविष्यात कधीच समझोता करणार नाही हे परत एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शिकलकरी समाजाच्या मेळाव्यानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा झाला. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
आम्ही स्वतःच्या बळावर निवडणुका लढू शकतो हे पत्रकारांनी स्वीकारावे असे ते यावेळी म्हणाले. नामांतरापेक्षा औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला कळीचा वाटतो. महापालिका वंबआच्या ताब्यात दिल्यास दररोज दोन तास पाणी रात्री दहाच्या आत पुरविण्याची खात्री मी देतो. अकोल्यात आम्ही हे करून दाखवले आहे. आहे त्या परिस्थितीत कोणत्याही खर्चाची योजना न राबविता आम्ही औरंगाबादला दररोज दोन तास पाणी पुरविण्याचे आश्वासन देत आहोत, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.
राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सर्व पक्षांनी सर्वात जास्त जागा जिंकण्याचा दावा केला. परंतु वंचित बहुजनच्या किती आणि कुठे जागा निवडून आल्या, याचा तपशील २१ तारखेला देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निकाला संदर्भात विचारणा केली असता, सर्व पक्ष करत असलेल्या दाव्यांच्या होडीमध्ये बसणार नाही. वंचित बहुजन आघाडीने किती जागा ताब्यात घेतल्या याचा तपशील २१ तारखेला मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांविरोधात खुद्द शरद पवार उतरणार मैदानात !
- मोठी बातमी : कोरोना लसीबाबत सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली महत्वाची मागणी
- ‘स्वतःला जाणते नेते समजणारे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत’
- पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदी कोण? काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, वरपुडकरांचेही नाव चर्चेत
- ऑस्ट्रेलिया फत्ते, आता इंग्लंड काबीज करण्यासाठी भारतीय संघाची घोषणा !


