Share

‘संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनाच निर्णय घेऊ शकते, पण…’

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांचा या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

गेल्या आठवड्याभरा पासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. संजय राठोड यांना पदावरून हटवण्याची भाजपकडून केली जात आहे यावर, ‘ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यांना पदावरून हटवण्याबाबत शिवसेनाच निर्णय घेऊ शकते’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.

‘आताच्या गढीला ती व्यक्ती निराधार आहे. मागे देखील धनानंजय मुंडेंबाबत असे आरोप करण्यात आले होते. तेव्हा माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. तक्रारदार महिलेने काय सांगितलं हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. चौकशी पूर्ण होई पर्यंत एखाद्याला दोषी धरणं किंवा पदावरून हटवणं हे योग्य नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यांना पदावरून हटवण्याबाबत शिवसेनाच निर्णय घेऊ शकते. पण एक त्रयस्थ म्हणून माझं असं मत आहे कि, चौकशीतून अंतिम अहवाल समोर येत नाही तोपर्यंत धीर ठेवला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!