यवतमाळ : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिलेला होता. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले होते.
आता या प्रकरणाला काहीस वेगळ वळण मिळताना दिसत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘पूजा अरूण राठोड’ नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच पूजा अरूण राठोड नावाची महिला ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेली होती.
तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे. मात्र, याबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी केला आहे. डॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली त्या महिलेवर उपचार करण्यात आले आणि दुपारी घरी सोडण्यात आले होते. अशी माहिती आता समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राठोड सर्वांच्या संपर्कात आहेत, त्यांनी कोणताही खुलासा करू नये हा माझा सल्ला’
- ‘लोकशाहीची घात करून पंजाबमध्ये काँग्रेसने विजय मिळवला’
- ईडीप्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा तूर्तास दिलासा !
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- पंजाब निवडणुकांत भाजप भुईसपाट ; शेतकरी आंदोलनाचे पडसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

