Share

१०० टक्के लसीकरण झाले तरच ‘औरंगाबाद’ जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल-जिल्हाधिकारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये विशेष लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. लसीकरण झाले तर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होईल त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरणाच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

सोमवार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कागजीपुरा, खुलताबाद, सुलीभंजन तसेच वेरूळ येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला आणि अधिकाधिक लसीकरण करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी कागजीपुराच्या सरपंच नसरीन कुरेशी, उपसरपंच शेख अहमद, सुलीभंजनचे सरपंच इलियास युनूस, उपसरपंच रुपाली घोडके तसेच गावकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना आवाहन केले की आपल्या गावातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे. ज्या गावात लसीकरण अल्प प्रमाणात होईल त्या गावांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागेल. ज्या गावात लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल त्या गावाला अधिकचा निधी देण्यात येईल. याशिवाय अशा गावाला विविध माध्यमातून मदत करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार देशमुख तसेच सरपंच आणि उपसरपंच उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!