Share

फक्त महिला सुरक्षेवर २ दिवसांचं अधिवेशन बोलवावं; नितेश राणेंची मागणी

Published On: 

मुंबई : साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज पीडित महिलेच्या दुःखद निधनाची बातमी मिळताच अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडवले जात आहेत. सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन २ दिवसांचं अधिवेशन फक्त महिला सुरक्षेवर बोलवण्यात यावं, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाढत चालले आहेत. पुणे, मुंबई, अमरावती असो ज्या प्रकारे या गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे याची मुख्य कारणच हे आहे की राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी नेतेच महिलांवर अत्याचार करत आहेत. पोलीस खातं हे नेत्या मंडळींना वाचवण्यासाठीच वापरलं तर या गुन्हागारांती भीतीच संपली आहे, असा गंभीर आरोप यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

नेते, मंत्र्यांवर कारवाया होत नसतील गुन्हे दाखल होत नसतील तर या गुन्हेगारांना तर मैदान खुलंच आहे. दिशा शालन, पूजा चव्हाण, करुणा मुंडे प्रकरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचं प्रकरण असो किंवा मग डॉ. पाटकर यांचा विषय असो सत्ताधारी नेते मंत्रीच जर असे अत्याचार करत असतील तर ही गुन्हेगारी थांबवणार कोण?, असा सवाल करत नितेश राणेंनी मंत्री नेत्यांचे दाखले देत महिला अत्याचारांचा पाढा वाचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!