बीड : ‘मुलीचा वाढदिवस आहे, तुमचा नृत्य कार्यक्रम ठेवायचा आहे’ अशी थाप मारत क्यूआर कोड पाठवून एका नृत्य शिक्षकाला ५८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार बीडमध्ये घडलाय. ही घटना १० जानेवारी रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीडमध्ये सागर शिवाजी वैद्य (रा. नवगण राजुर) हे खासगी नृत्य शिक्षक आहेत. १० जानेवारी रोजी त्यांना एका क्रमांकावरून पंकजकुमार पांडे (रा. शेगाव, जि. बुलडाणा) याचा फोन आला. ‘माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तुमचा नृत्य कार्यक्रम ठेवायचा आहे,’असे सांगून त्याने एक क्यूआर कोड पाठवला. तो स्कॅन करा, लगेच तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगितले.
हा कोड स्कॅन करताच शिक्षक त्यांच्या खात्यातून ५८ हजार रुपये विड्रॉल झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी पंकजकुमार पांडेवर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “आमच्या धनुभांऊवर पूर्ण विश्वास”-आ. संदीप क्षीरसागर
- लस निर्यातीवर बंदी असताना देखील ब्राझीलच्या मदतीसाठी भारत पुढे
- ‘असा सोशल मीडिया बनवा ज्या वरून माझे वडिल बॅन होणार नाही’
- चाकूने मारले, पोत्यात भरून कालव्यातील पाण्यात टाकले; तरीही महिला जिवंत
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिक्षा रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

